श्यामची आई' हा मराठी बालसाहित्यातला अनमोल
संस्कारांचा ठेवा आहे. छोटया श्यामवर आईने केलेले संस्कार हे फक्त श्यामसाठीच
नाहीतर प्रत्येक पिढीसाठी आहेत. प्र. के. अत्र्यांनी त्यावर चित्रपट काढून
त्याकाळी वेगळया पण प्रभावी माध्यमातून संस्कारमूल्य सादर केली. आता तर 'श्यामची आई'ची व्हिसीडीही उपलब्ध आहे. माध्यमांचा
वाढता प्रभाव आणि वाचनापासून दूर होत चाललेली पिढी. प्रत्येक घरात पालकांना आपल्या
मुलासाठी द्यायला कमी वेळ आहे. मग हे संस्कार होणार तरी कसे?
'श्यामची आई' हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. छोटया श्यामवर आईने
केलेले संस्कार हे फक्त श्यामसाठीच नाहीतर प्रत्येक पिढीसाठी आहेत. प्र. के.
अत्र्यांनी त्यावर चित्रपट काढून त्याकाळी वेगळया पण प्रभावी माध्यमातून
संस्कारमूल्य सादर केली. आता तर 'श्यामची आई'ची व्हिसीडीही उपलब्ध आहे. माध्यमांचा वाढता प्रभाव आणि वाचनापासून दूर
होत चाललेली पिढी. प्रत्येक घरात पालकांना आपल्या मुलासाठी द्यायला कमी वेळ आहे.
मग हे संस्कार होणार तरी कसे? मुलांना संस्कार संपन्न
करण्याचा वसा पुण्याच्या पुराणिकांनी उचलला आहे. पुराणिक आजोबा ७६ वर्षांचे आहेत,
पण त्यांचे वैशिष्टय असे की गेली तेरा वर्ष 'श्यामची
आई' हे पुस्तक पुण्यात घरोघरी जाऊन ते विक्री करतात.
त्यांच्यामते साने गुरूजींच्या कार्याचा वसा पुढे चालविण्यात ते खारीचा वाटा उचलत
आहेत. पुराणिकांशी गप्पात मध्ये ध्येयपूर्तीच्या ध्यासाने झपाटणे म्हणजे काय
ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
पुराणिक आजोबा लहान
होते तेव्हा पूज्य साने गुरूजींच्या कार्यात सहभागी झाले होते. गुरूजींबरोबर
प्रत्यक्ष काम केल्यामुळे त्यांच्या मुल्यांचा, विचारांचा आणि नवीन पीढी
संस्कारक्षम करण्याचा प्रभाव पुराणिकांवर झाला. उद्याची पिढी व पर्यायाने समाज जर
संस्कारशील करायचा असेल तर आजच पाऊले उचलायला हवीत. प्रथम त्यांनी मुलांसाठी
कार्यशाळा घ्यायला सुरूवात केली. कार्यशाळेत साने गुरूजींचे विचार, 'श्यामची आई' मधल्या संस्कार कथा मुलांना सांगितल्या
जायच्या. पण ह्या सगळयासाठी वेळ खुप लागायचा तसेच काही मर्यादीत मुलानांच लाभ
व्हायचा. पुराणिकांनातर अवघा समाजच संस्कारक्षम करून सोडायचा होता. १३
वर्षांपूर्वी पुराणिकांनी 'श्यामची आई' हे पुस्तक घरोघरी विकण्याचा मानस केला. त्यांना त्यांचा मार्ग सापडला. रोज
निदान एकतरी पुस्तक विकायचे म्हणजेच १३ वर्षात ४७४५ घरात त्यांनी पुस्तक पोहचविले.
पण प्रत्यक्षात ही संख्या १५००० च्या वर आहे. एक हाती पुस्तक विकण्याचा हा विक्रमच
म्हणावा लागेल.
पुराणिक आजोंबाचा
संकल्प इतका द्ढ आहे की जर एखाद्या दिवशी विक्री नाही झाली तर आजोबा एकवेळचे जेवण
करीत नाहीत. सुदैवाने ही वेळ १३ वर्षांत फक्त तीनदा आली आहे. आपल्या समाजात अजूनही
चांगुलपणा आणि मुल्ये टिकून आहेत ह्यांनी ते सुखावतात. काळ बदलला तशी माध्यमे
बदलली. त्यामुळे पुराणिकांकडे 'श्यामच्या आई' चे इग्रंजीत
रूपांतर केलेलं पुस्तक तसेच व्हिसीडीही असतात. त्यामुळे अनेक अमराठी तसेच वाचनाचा
कंटाळा करणा-या मुलांपर्यंत त्यांना पोहोचवता येते. मुख्य म्हणजे मुळ किमंतीपेक्षा
सवलतीच्या दरात ही पुस्तके पुराणिकांकडे उपलब्ध असतात.
पुराणिक दाम्पत्याची रहाणी अतिशय साधी आहे.
पुण्यात शनिवारवाडयाजवळ छोटयाशा घरात त्यांचे वास्तव्य आहे. घरात गरजेपूर्तेसामान, देवघरात साने गुरूजींचा फोटो
आणि 'श्यामच्या आईच्या' पुस्तकांचे गठ्ठे!
हीच पुराणिकांची इस्टेट. पुराणिक आजोबा आपल्या अंथरूणाला खिळलेल्या पत्नीचे आवरून
सकाळीच पुस्तके घेऊन बाहेर पडतात. दुपारी जेवण आणि आराम झाला की पुन्हा बाहेर
पडायचे ते संध्याकाळीच परतायचे. दैनंदिन जीवनाचा आवश्यक असा वेळ सोडला तर संपूर्ण
दिवस पुराणिक 'श्यामची आई' प्रसारासाठी
घालवतात. ह्यासाठी कधी पायपीट तर कधी स्वत:च्या पदरचे भाडे पैसे खर्च करून
पुस्तकांची विक्री करतात. अशा वेळेला आधीच जमलेल्या ग्रुप, वाढदिवस,
बारसे, मुंज असेल तर एका झटक्यात त्यांची
विक्री होते.
मुलांच्या संस्काराची
कास धरणा-या पुराणिक आजोबांच्यामते संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्न विचारला असता मोठे
चिंतनशील उत्तर त्यांनी दिले. ''दगडाच्या मूर्तीत देव
शोधतांना, माणूसकीला अधिक महत्व देणे. दुस-याकडून आदर,
विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते
आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे.
संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात."
पुराणिकांशी
गप्पांमध्ये एक वेगळाच जीवनाचा पैलू समोर आला. नवीन पीढींत प्रत्येक गावात
पुराणिंकाचा वसा पुढे चालवणारा कोणीतरी हवा. तसे झाले तर संपूर्ण देश संस्काक्षम
होईल. प्रसंगांना विविध भेटवस्तू देण्याऐवजी 'श्यामची आई' भेट देण्याचा वसा आपणही सा-यांनी घेऊ या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा