✡ नवचैतन्याला
फुलवुया ✡
आदरणीय प्रतिभा भराडे मँडम यांनी नवीन
आलेल्या पहिलीसाठी सुचवलेले उपयुक्त उपक्रम
हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी
१) टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२) गादीवर कोलांट्या उड्या
३) झोका खेळणे
४) एका पायावर तोलणे
५) शांत संगीतावर हलचाल
६) तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७) सरळ रेषेत कागद फाडणे
८) घडी घालून कागद फाडणे
निर्णयक्षमता विकसनासाठी
९) ठसेकाम
१॰) बाटल्या,बरण्यांची
झाकणे काढणे लावणे
११) बाटलीत बरणीत माती भरणे
१२) कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता
,बोटांना वळण लावण्यासाठी)
समजपूर्वक ऐकण्यासाठी
१३) गाणी गोष्टी ऐकवणे
१४) टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५) एका वाक्याची सूचना देणे
१६) छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७) मातीकाम
१८) धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९) दोर्यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰) खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१) मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२) वेणी घालणे
२३) आकार काढुन बिया,खडे
लावणे
२४) वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारणे
२५) एक काम१५ मिनिटांसाठी देवून बैठक वाढवण्यास मदत
वरील सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला
निर्णयक्षमता विकसनास मदत होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा